प्रति,
मा.प्रदेशाध्यक्ष - सुदामआण्णा खैरनार
अखिल महाराष्ट्र सुतार - लोहार संघ.
काल दि. 25 डिसेंबर भोसरी, पुणे येथे सुतार समाजाच्या वधू -वर मेळाव्यास उपस्थित रहाता आले. अनेक विषयांवर चर्चा झाली भाषणातून संदर्भ ऐकायला मिळाले. ज्यांनी स्वतः ला नेते समजत भाषणं केली त्यांचा बुद्धीची कीव येते. नागोजी पांचाळ यांनी केलेलं वाद ग्रस्त विधान " मा. सुदाम आण्णा खैरनार, हे समाज करणातील सगळ्यांचा बाप आहे. " सुतार समाजात नेतृत्व करणारा प्रत्येकजण माझ्या बरोबर घडला. या सर्व विधानाचा मी निषेध करतो.कारण आपण एका विशिष्ट चौकटीत राहून विचार करता आहात. माझ्या सारखा कार्यकर्ता याला अपवाद आहे. तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांचा पुढची रस्त्यावरची लढाई आम्ही लढत आहोत. अनेक उपोषणं, आंदोलन सातत्याने सरकारचा विरोधात करत आहोत.समाजातील समन्व्य आणि ऐकीकरणासाठी निश्चित आपण प्रयत्न करावा. पण अशी भाषा आपण वापरत असाल तर हा समाज एक संघ होणार नाही.
माझ्या सारखे अनेक तरुण युवक अप्रत्यक्ष का होईना आपणास समाजातील आदर्श मानतात. आपल्या नेत्यांना सबुरीचा सल्ला द्यावा. अन्यथा समाज आपल्यापासून दुरावला जाईल. आपली लढाई खूप मोठी आहे.
आपली माफी मागतो....आपला अनुभव मोठा आहे !!
पण समाजातील, चळवळीतील काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपणास विंनती.
आपला स्नेहांकित,
प्रमोद दिवेकर - संपर्क सचिव
लोकतांत्रिक जनता दल.
माहिती साठी..
मा. हनुमंत पांचाळ - प्रभारी अध्यक्ष
अखिल महाराष्ट्र विश्व्कर्मा सुतार समाज महासंघ.
मा.डॉ. दिलीप ताजवे - उपाध्यक्ष (अ.म.सु.लो.संघ )
मा. जयसिंग वाकचौरे सरचिटणीस (अ.म.सु.लो. संघ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा