मुख्य सामग्रीवर वगळा
डोंगरी भागातील "सोन्या" महाराष्ट्राच्या राजकारणात !
नगर-कल्याण हायवेवर वसलेल्या छोट्याश्या ' सावरगाव ' ता-पारनेर,जि-अ.नगर या खेडेगावात वेल्डींग व्यवसायीक उद्योजक संजय दिवेकर,आई संगीता यांच्या कुटुंबात  १५मार्च १९९१ ला जन्मलेला सावरगावचा लाडका सोन्या ऊर्फ प्रमोद दिवेकर महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतोय याचा आम्हाला अभिमान वाटतोय.
    लहान पणा पासुनच त्याला लिखाणाची,भाषणांची आवड होती.वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात तो आवडीने सहभागी व्हायचा.अंधश्रद्धा निर्मुलनाची तर त्यास खुप त्यामुळे जादूटोना,भोंदू बाबांच्या विरोधात नेहेमी त्याची शालेय नाटके असायची .पुढे सर्वात लोकप्रिय झालेल त्याचे जिल्हा पातळीवरील भाषण 'मी,सरपंच झालो तर!'या भाषणाने त्याला जिल्हा पातळीवर नावलौकीक मिळवून दिला .शिक्षणाच्या निमित्ताने १० वी नंतर तो महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला गेला आणि त्यास समाज सेवेची संधी मिळाली .
११ वीला असतानाच त्याची नाळ ग.प्र.प्रधान मास्तर .मा.गृहराज्यमंत्री भाई वैद्य,डॉ.बाबा आढाव यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन राष्ट्र सेवा दलांच्या शिबीरात जाऊन समाजवादी विचार त्याच्यावर रूजले.पुढे महाविद्यालयीन जिवणात विद्यार्थ्यांचा प्रश्नांवर लढत असताना छात्रभारती संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने,मोर्चे काढले.अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवर लढत असताना महाराष्ट्रातील अभ्यासु,विचारवंत आमदार कपिल पाटील यांच्या भाषणांनी प्रभावीत होऊन राजकारणाची आवड निर्माण झाली.आमदार कपिल पाटील यांनी कामाची दखल घेत पुणे शहराच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली.जबाबदारीने काम करत लोकांच्या सामाजिक प्रश्नावर काम करत पक्ष संघटन वाढवले.कार्यकर्त्यांची व्याप्ती वाढवत पुणे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारत संपूर्ण जिल्हा पिंजुन काढला .
   लोकभारती पक्ष हा मर्यादित न रहाता मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती व्हावी या साठी आमदार कपिल पाटील साहेब आणि पदाधिकाऱ्यांनी लोकभारती हा पक्ष  " जनता दल युनायटेड " मध्ये विलणीकरणाचा निर्णय घेतला आणि खासदार शरदजी यादव राष्ट्रीय नेते जदयु यांच्या पक्षात विलीन झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी त्यांचा सोबत काम करता यावं या करीता ' संपर्क सचिव ' महाराष्ट्र प्रदेश या महत्त्वाचा पदावर संधी दिली . याचा " आम्हा सावरगाव " करांना अभिमान वाटतो.
 या सर्व कामात त्याला मार्गदर्शन करणारे अशोक बेलसरे सर,अॅड.जाकिर अत्तार ,अजित शिंदे ,अतुल देशमुख,राकेश नेवासकर,विनय खेडेकर,फय्याज इनामदार,जितेंद्र कांबळे,खालीदभाई पटेल या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत .
वर्ग मित्र
प्रा.सुनिल बागुल,निखिल चिकणे,गणेश शिंदे ,वैभव भारती
आणि आम्ही सावरगावकर ग्रुप
🙏🙏🙏

टिप्पण्या