पैशाने मोठा नसला तरी,मनाने,नावाने मोठा असणारा माझा माणूस -आमदार कपिल पाटील (प्रदेश अध्यक्ष जदयु,महाराष्ट्र)
विद्यार्थी चळवळी पासुन ते पत्रकारीता,शिक्षकांच्या अनेक प्रश्नांनसाठी लढताना आमदार कपिल पाटील यांना आपण पाहिले पण त्याही पलीकडे मी पाहिलेले आमदार कपिल पाटील
अचानक फोन आला क्ष-व्यक्ती (अतिशय माझ्या जवळचीच)संगमनेर येथे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे.डॉक्टर बोलले पेशंटला तात्काळ हलवावे लागेल.ह्रदयविकाराचा त्रास होता,ह्रदयाचे ठोके अचानक बंद होत होते.पेशंटची परिस्थिती हलाक्याची होती.अॉपरेशनसाठी लाखो रूपये खर्च येणार होता.काय करायचं हा प्रश्न मलाही होता आणि समोरच्यांनाही पण.माझा सहकारी मित्र फय्याज इनामदार आणि मी चर्चा केल्या नंतर पुण्यातील नामवंत ह्रदयविकाराच्या डॉक्टरांना फोन केला आणि आमदार कपिल पाटील यांची अोळख सांगितली त्यांनी कोणताही विचार न करता पेशंटला पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्यास सांगितले.रात्री१;०० वाजता पेशंटला मी आणि फय्याज इनामदारांनी अॅडमीट केले .डॉक्टरांनी एकही रूपये घेतले नाही.दुसऱ्याच दिवशी पेशंटला अॉपरेशनसाठी घेण्यात आले.त्या साठी कोणत्याही प्रकारची फी त्यांनी आकारली नाही.मरणाच्या दारातला माझा माणूस वाचवला.आजही व्यवस्थित आहे.कारण ही सर्व कीमया आहे आमदार कपिल पाटील यांच्या सोबत काम करण्याची,त्याच्या नावाची.लोक विचारतात आमदारांनी तुला काय दिले ? उत्तर हेच असेल - जिवदान दिले,नवे आयुष्य दिले.
प्रमोद दिवेकर
संपर्क सचिव-जदयु
महाराष्ट्र प्रदेश .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा