मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युवा जदयु अध्यक्षांची निवड तरूणांना योग्य दिशा देणारी .

युवा जदयु अॅड.शरद कोकाटेंची निवड तरूणांना योग्य दिशा देणारी .     दि.२२ एप्रिल नेस्को ग्राऊंड,मुंबई येथे सन्माननिय मुख्यमंत्री नितिश कुमार (राष्ट्रीय अध्यक्ष,जदयु)यांचा उपस्थितीत आमदार कपिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली .या निवडीने महाराष्ट्रात अनेक राजकीय वितर्क लावण्यात आले,डाव्या-उजव्या सर्वांच्याच भुवया उंचवल्या,अनेक राजकीय समीकरणे जुळवली गेली.          त्याच पद्धतीने युवा जनता दल अध्यक्षपदाची निवडही अनेक युवा संघटनांमध्ये  चर्चेचा विषय ठरत आहे.परंतु ही निवड महाराष्ट्रातील तरुणाईला योग्य दिशा देणारी आहे.कारण अॅड.शरद कोकाटे छात्रभारतीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांन वर लढत होते.छात्रभारती महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.कपिल सरांन सोबत प्रत्येक आंदोलनात सहभागी असतात.        नुकतीच ९ जुलै रोजी युवा जदयु राज्य कार्यकारणीची बैठक पुण्यात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा.अतुल देशमुख यांचा उपस्थितीत पार पडली .या मध्ये कुलदीप आंबेकर(एम.एस.सी,पत्रकारीता) निलेश निंबाळकर(एम.प...
पैशाने मोठा नसला तरी,मनाने,नावाने मोठा असणारा माझा माणूस -आमदार कपिल पाटील (प्रदेश अध्यक्ष जदयु,महाराष्ट्र)      विद्यार्थी चळवळी पासुन ते पत्रकारीता,शिक्षकांच्या अनेक प्रश्नांनसाठी लढताना आमदार कपिल पाटील यांना आपण पाहिले पण त्याही पलीकडे मी पाहिलेले आमदार कपिल पाटील     अचानक फोन आला क्ष-व्यक्ती (अतिशय माझ्या जवळचीच)संगमनेर येथे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे.डॉक्टर बोलले पेशंटला तात्काळ हलवावे लागेल.ह्रदयविकाराचा त्रास होता,ह्रदयाचे ठोके अचानक बंद होत होते.पेशंटची परिस्थिती हलाक्याची होती.अॉपरेशनसाठी लाखो रूपये खर्च येणार होता.काय करायचं हा प्रश्न मलाही होता आणि समोरच्यांनाही पण.माझा सहकारी मित्र फय्याज इनामदार आणि मी चर्चा केल्या नंतर पुण्यातील नामवंत ह्रदयविकाराच्या डॉक्टरांना फोन केला आणि आमदार कपिल पाटील यांची अोळख सांगितली त्यांनी कोणताही विचार न करता पेशंटला पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्यास सांगितले.रात्री१;०० वाजता पेशंटला मी आणि फय्याज इनामदारांनी अॅडमीट केले .डॉक्टरांनी एकही रूपये घेतले नाही.दुसऱ्याच दिवशी पेशंटला अॉपरेशनसाठी घेण्यात आले.त्या साठ...