देशाची लोकशाही धोक्यात आहे... संविधान वाचवण्यासाठी एक व्हा !!! दिवंगत नेते जेष्ठ समाजवादी, विचारवंत मा. गृहराज्य मंत्री भाई वैद्य यांचा निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र समाजवादी, अभ्यासू आमदार कपिल पाटील यांच्याकडे मोठया आशेने पहात आहे. जेष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांनी लोकतंत्र आणि देशाची सांझी विरासत वाचवण्यासाठी एक होण्याची हाक दिली आहे. "लोकतांत्रिक जनता दल "या नव्या पक्षाची स्थापना उद्या नवी दिल्ली येथे होणार आहे. आमदार कपिल पाटील यांनी घेतलेल्या योग्य निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत होत असतानाच अनेक समाजवादी संविधान प्रेमी तरुण कार्यकर्ते महाराष्ट्रातून उद्या या पक्षात प्रवेश करणार आहेत. पुन्हा एकदा सर्व समाजवादी, डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना विनंती देशाची लोकशाही, संविधान वाचवण्याची हीच योग्य वेळ आहे. आपणही यात सहभागी व्हा !!!! प्रमोद दिवेकर लोकतांत्रिक जनता दल