युवा जदयु अॅड.शरद कोकाटेंची निवड तरूणांना योग्य दिशा देणारी .
दि.२२ एप्रिल नेस्को ग्राऊंड,मुंबई येथे सन्माननिय मुख्यमंत्री नितिश कुमार (राष्ट्रीय अध्यक्ष,जदयु)यांचा उपस्थितीत आमदार कपिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली .या निवडीने महाराष्ट्रात अनेक राजकीय वितर्क लावण्यात आले,डाव्या-उजव्या सर्वांच्याच भुवया उंचवल्या,अनेक राजकीय समीकरणे जुळवली गेली.
त्याच पद्धतीने युवा जनता दल अध्यक्षपदाची निवडही अनेक युवा संघटनांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.परंतु ही निवड महाराष्ट्रातील तरुणाईला योग्य दिशा देणारी आहे.कारण अॅड.शरद कोकाटे छात्रभारतीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांन वर लढत होते.छात्रभारती महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.कपिल सरांन सोबत प्रत्येक आंदोलनात सहभागी असतात.
नुकतीच ९ जुलै रोजी युवा जदयु राज्य कार्यकारणीची बैठक पुण्यात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा.अतुल देशमुख यांचा उपस्थितीत पार पडली .या मध्ये कुलदीप आंबेकर(एम.एस.सी,पत्रकारीता) निलेश निंबाळकर(एम.पी.एस.सी)रविंद्र मेढे(पी.एच.डी.) प्रणय साळवी(बॅंकींग) संध्या भामडे,जयेश पटेल या विद्यार्थ्यां्यांचा अनेक प्रश्नांन वर संघर्ष करणाऱ्या अनुभवी तरूणांची राज्य कार्यकारणीवर निवड करण्यात आली.या निवड होत असतानाच महाविद्यालयीन निवडणुकांंन पासुन ते शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रश्नानवर चर्चा करण्यात आली.जदयुचा विस्तार प्रत्येक गावांमध्ये करण्यासाठी सभासद मोहीम राबवण्यात येईल . या निवडीनमध्ये सर्वच शाखांतील शिक्षण घेतलेल्या तरूणांना सहभागी केले त्यामुळे निश्चितच सर्वच प्रश्न सोडले जातील .
या बैठकीीस पक्षाचे पदाधिकारी अॅड.जाकीर अत्तार ,अॅड.मोहन वाडेकर,अजित शिंदे ,अॅड.सयाजी शिंदे ,राकेश नेवासकर,फय्याज इनामदार व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते
प्रमोद दिवेकर - संपर्क सचिव
जदयु , महाराष्ट्र प्रदेश .


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा