मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

प्रति, मा.प्रदेशाध्यक्ष - सुदामआण्णा खैरनार अखिल महाराष्ट्र सुतार - लोहार संघ.   काल दि. 25 डिसेंबर भोसरी, पुणे  येथे सुतार समाजाच्या वधू -वर  मेळाव्यास उपस्थित रहाता आले. अनेक विषयांवर चर्चा झाली भाषणातून संदर्भ ऐकायला मिळाले. ज्यांनी स्वतः ला नेते समजत भाषणं केली त्यांचा बुद्धीची कीव येते. नागोजी पांचाळ यांनी केलेलं वाद ग्रस्त विधान " मा. सुदाम आण्णा खैरनार, हे समाज करणातील सगळ्यांचा बाप आहे. " सुतार समाजात नेतृत्व  करणारा प्रत्येकजण माझ्या बरोबर घडला. या सर्व विधानाचा मी निषेध करतो.कारण आपण एका विशिष्ट चौकटीत राहून विचार करता आहात. माझ्या सारखा कार्यकर्ता याला अपवाद आहे. तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांचा पुढची रस्त्यावरची लढाई आम्ही लढत आहोत. अनेक उपोषणं, आंदोलन सातत्याने सरकारचा विरोधात करत आहोत.समाजातील समन्व्य आणि ऐकीकरणासाठी निश्चित आपण प्रयत्न करावा. पण अशी भाषा आपण वापरत असाल तर हा समाज एक संघ होणार नाही.       माझ्या सारखे अनेक तरुण युवक अप्रत्यक्ष का होईना आपणास  समाजातील आदर्श मानतात. आपल्या नेत्यांना सबुरीचा सल्ला द्यावा. अन्यथा समाज आपल्यापासून दुरावला जाईल.
अलीकडील पोस्ट
देशाची लोकशाही धोक्यात आहे... संविधान वाचवण्यासाठी एक व्हा !!! दिवंगत नेते जेष्ठ समाजवादी, विचारवंत मा. गृहराज्य मंत्री भाई वैद्य यांचा निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र समाजवादी, अभ्यासू आमदार कपिल पाटील यांच्याकडे मोठया आशेने पहात आहे. जेष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांनी लोकतंत्र आणि देशाची सांझी विरासत वाचवण्यासाठी एक होण्याची हाक दिली आहे. "लोकतांत्रिक जनता दल "या नव्या पक्षाची स्थापना उद्या नवी दिल्ली येथे होणार आहे. आमदार कपिल पाटील यांनी घेतलेल्या योग्य निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत होत असतानाच अनेक समाजवादी संविधान प्रेमी तरुण कार्यकर्ते महाराष्ट्रातून उद्या या पक्षात प्रवेश करणार आहेत. पुन्हा एकदा सर्व समाजवादी, डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना विनंती देशाची लोकशाही, संविधान वाचवण्याची हीच योग्य वेळ आहे. आपणही यात सहभागी व्हा !!!! प्रमोद दिवेकर लोकतांत्रिक जनता दल
डोंगरी भागातील "सोन्या" महाराष्ट्राच्या राजकारणात ! नगर-कल्याण हायवेवर वसलेल्या छोट्याश्या ' सावरगाव ' ता-पारनेर,जि-अ.नगर या खेडेगावात वेल्डींग व्यवसायीक उद्योजक संजय दिवेकर,आई संगीता यांच्या कुटुंबात  १५मार्च १९९१ ला जन्मलेला सावरगावचा लाडका सोन्या ऊर्फ प्रमोद दिवेकर महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतोय याचा आम्हाला अभिमान वाटतोय.     लहान पणा पासुनच त्याला लिखाणाची,भाषणांची आवड होती.वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात तो आवडीने सहभागी व्हायचा.अंधश्रद्धा निर्मुलनाची तर त्यास खुप त्यामुळे जादूटोना,भोंदू बाबांच्या विरोधात नेहेमी त्याची शालेय नाटके असायची .पुढे सर्वात लोकप्रिय झालेल त्याचे जिल्हा पातळीवरील भाषण 'मी,सरपंच झालो तर!'या भाषणाने त्याला जिल्हा पातळीवर नावलौकीक मिळवून दिला .शिक्षणाच्या निमित्ताने १० वी नंतर तो महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला गेला आणि त्यास समाज सेवेची संधी मिळाली . ११ वीला असतानाच त्याची नाळ ग.प्र.प्रधान मास्तर .मा.गृहराज्यमंत्री भाई वैद्य,डॉ.बाबा आढाव यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन राष्ट्र सेवा दलांच्या शिबीरात जाऊन समाजवादी वि

युवा जदयु अध्यक्षांची निवड तरूणांना योग्य दिशा देणारी .

युवा जदयु अॅड.शरद कोकाटेंची निवड तरूणांना योग्य दिशा देणारी .     दि.२२ एप्रिल नेस्को ग्राऊंड,मुंबई येथे सन्माननिय मुख्यमंत्री नितिश कुमार (राष्ट्रीय अध्यक्ष,जदयु)यांचा उपस्थितीत आमदार कपिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली .या निवडीने महाराष्ट्रात अनेक राजकीय वितर्क लावण्यात आले,डाव्या-उजव्या सर्वांच्याच भुवया उंचवल्या,अनेक राजकीय समीकरणे जुळवली गेली.          त्याच पद्धतीने युवा जनता दल अध्यक्षपदाची निवडही अनेक युवा संघटनांमध्ये  चर्चेचा विषय ठरत आहे.परंतु ही निवड महाराष्ट्रातील तरुणाईला योग्य दिशा देणारी आहे.कारण अॅड.शरद कोकाटे छात्रभारतीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांन वर लढत होते.छात्रभारती महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.कपिल सरांन सोबत प्रत्येक आंदोलनात सहभागी असतात.        नुकतीच ९ जुलै रोजी युवा जदयु राज्य कार्यकारणीची बैठक पुण्यात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा.अतुल देशमुख यांचा उपस्थितीत पार पडली .या मध्ये कुलदीप आंबेकर(एम.एस.सी,पत्रकारीता) निलेश निंबाळकर(एम.पी.एस.सी)रविंद्र मेढे(पी.एच.डी.) प्रणय साळवी(बॅंकींग) संध्या
पैशाने मोठा नसला तरी,मनाने,नावाने मोठा असणारा माझा माणूस -आमदार कपिल पाटील (प्रदेश अध्यक्ष जदयु,महाराष्ट्र)      विद्यार्थी चळवळी पासुन ते पत्रकारीता,शिक्षकांच्या अनेक प्रश्नांनसाठी लढताना आमदार कपिल पाटील यांना आपण पाहिले पण त्याही पलीकडे मी पाहिलेले आमदार कपिल पाटील     अचानक फोन आला क्ष-व्यक्ती (अतिशय माझ्या जवळचीच)संगमनेर येथे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे.डॉक्टर बोलले पेशंटला तात्काळ हलवावे लागेल.ह्रदयविकाराचा त्रास होता,ह्रदयाचे ठोके अचानक बंद होत होते.पेशंटची परिस्थिती हलाक्याची होती.अॉपरेशनसाठी लाखो रूपये खर्च येणार होता.काय करायचं हा प्रश्न मलाही होता आणि समोरच्यांनाही पण.माझा सहकारी मित्र फय्याज इनामदार आणि मी चर्चा केल्या नंतर पुण्यातील नामवंत ह्रदयविकाराच्या डॉक्टरांना फोन केला आणि आमदार कपिल पाटील यांची अोळख सांगितली त्यांनी कोणताही विचार न करता पेशंटला पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्यास सांगितले.रात्री१;०० वाजता पेशंटला मी आणि फय्याज इनामदारांनी अॅडमीट केले .डॉक्टरांनी एकही रूपये घेतले नाही.दुसऱ्याच दिवशी पेशंटला अॉपरेशनसाठी घेण्यात आले.त्या साठी कोणत्याही प्रकारची फी